भाजपा चित्रपट आघाडीची औपचारिक बैठक

भाजपा चित्रपट आघाडीची औपचारिक बैठक आज दि. ९ ऑगस्ट रोजी नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडली. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे अध्यक्ष मा. श्री. स ंजयभाऊ केनेकर यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक घेण्यात आली होती. या बैठकीचे आयोजन भाजपा चित्रपट आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. गोरक्षजी धोत्रे यांनी केले होते. चित्रपट आघाडीतील कार्यकर्त्यांचा वरिष्ठ नेत्यांशी संवाद वाढावा त्यांची तोंडओळख व्हावी, त्यांच्याकडून सुयोग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मा.संजयभाऊ केनेकर यांनी मार्गदर्शन करताना संघटना चळवळ चालवीत असताना ती समाजाभिमुख कशी ठेवायची, तळागाळातील लोकापर्यंत आपणहून कसे पोहचायचे, प्रस्थापित सरकार-शासकीय यंत्रणा आणि सर्व सामान्य जनता या साखळीमध्ये आपण कश्याप्रमाणे मध्यवर्ती दुवा होऊन शासन हातभाराला मदत करायची याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले. या बैठकीला कॅबिनेट कामगार मंत्री मा. संभाजी पाटील निलंगेकर आणि कॅबिनेट मंत्री मा. श्री. दिलीप कांबळे, कामगार संघटन सरचिटणीस मा. श्री. बाबा देसाई या मान्यवरांनी हजेरी लावून उपस्थिता...