पुण्यातील जेष्ठ कलावंतांचा सत्कार व पश्चिम महाराष्ट्राची कार्यकारणी

नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त पुण्यातील जेष्ठ कलावंतांचा सत्कार व पश्चिम महाराष्ट्राची कार्यकारणी जाहीर पुणे (दि २७) केंद्रीय परिवहन मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त, भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या वतीने जेष्ठ कलावंतांचा सत्कार व पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकारणीची पदनियुक्ती असा दुहेरी कार्यक्रम अण्णाभाऊ साठे सभागृहात घेण्यात आला. जेष्ठ कलावंतामध्ये रामचंद्र देखणे, सुहासिनी देशपांडे, जयराम कुलकर्णी, राजू जावळकर, लीला गांधी, जयमाला इनामदार, मधू गायकवाड, प ्रभाकर जोग, ज्योती चांदेकर आदी मान्यवरांना गौरवण्यात आले. या प्रसंगी भाजपा कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष संजय केणेकर, चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गोरक्ष धोत्रे, अभिनेते नागेश भोसले, नगरसेवक प्रवीण चोरबोले, चित्रपट कामगार आघाडीचे सल्लागार शिवाजी आव्हाड, सरचिटणीस सत्यवान गावडे, विजय सरोज, कोषाध्यक्ष संजय दळवी, इम्पाचे संचालक विकास पाटील, अभिनेते मिलिंद दास्ताने आदी मान्यवर व चित्रपट क्षेत्रातील सन्मानीय कलावंत व कर्मचारी उपस्थित होते. "चित्रपट क्षेत्राचे केंद्रीकरण झाले आहे. त्याचे विकेंद्रीकरण...