पुण्यातील जेष्ठ कलावंतांचा सत्कार व पश्चिम महाराष्ट्राची कार्यकारणी
नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त पुण्यातील जेष्ठ कलावंतांचा सत्कार व पश्चिम महाराष्ट्राची कार्यकारणी जाहीर
पुणे (दि २७)
केंद्रीय परिवहन मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त, भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या वतीने जेष्ठ कलावंतांचा सत्कार व पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकारणीची पदनियुक्ती असा दुहेरी कार्यक्रम अण्णाभाऊ साठे सभागृहात घेण्यात आला. जेष्ठ कलावंतामध्ये रामचंद्र देखणे, सुहासिनी देशपांडे, जयराम कुलकर्णी, राजू जावळकर, लीला गांधी, जयमाला इनामदार, मधू गायकवाड, प्रभाकर जोग, ज्योती चांदेकर आदी मान्यवरांना गौरवण्यात आले.
केंद्रीय परिवहन मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त, भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या वतीने जेष्ठ कलावंतांचा सत्कार व पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकारणीची पदनियुक्ती असा दुहेरी कार्यक्रम अण्णाभाऊ साठे सभागृहात घेण्यात आला. जेष्ठ कलावंतामध्ये रामचंद्र देखणे, सुहासिनी देशपांडे, जयराम कुलकर्णी, राजू जावळकर, लीला गांधी, जयमाला इनामदार, मधू गायकवाड, प्रभाकर जोग, ज्योती चांदेकर आदी मान्यवरांना गौरवण्यात आले.
या प्रसंगी भाजपा कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष संजय केणेकर, चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गोरक्ष धोत्रे, अभिनेते नागेश भोसले, नगरसेवक प्रवीण चोरबोले, चित्रपट कामगार आघाडीचे सल्लागार शिवाजी आव्हाड, सरचिटणीस सत्यवान गावडे, विजय सरोज, कोषाध्यक्ष संजय दळवी, इम्पाचे संचालक विकास पाटील, अभिनेते मिलिंद दास्ताने आदी मान्यवर व चित्रपट क्षेत्रातील सन्मानीय कलावंत व कर्मचारी उपस्थित होते.
"चित्रपट क्षेत्राचे केंद्रीकरण झाले आहे. त्याचे विकेंद्रीकरण व्हायाला हवे," असे मत श्री.संजय केणेकर यांनी या प्रसंगी मांडले, तसेच 'केंद्र व राज्य सरकारच्या योजना चित्रपट कामगारापर्यत पोहचायला हव्यात यासाठी संघटना पातळीवर कार्य हातात घेतले जाईल' असे ते पुढे म्हणाले. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासाठी चित्रपट कामगार आघाडीची कार्यकारणी श्री. गोरक्ष धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात जाहीर करण्यात आली. भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष श्री. गोरक्ष धोत्रे यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. "पदाधिकारी म्हणुन पदभार न स्वीकारता, संघटनेच्या माध्यमातून आपण कलाकारांना, कामगारांना जास्तीत जास्त समाजोपयोगी पडूया, असे आवाहन गोरक्ष धोत्रे यांनी याठिकाणी कार्यकर्त्याना दिले. समारोपाच्यावेळी गोरेगाव फिल्मसिटी मध्ये कामगारासाठी ऍम्ब्युलन्स व वसतिगृह चालू करण्यासाठी सांस्कृतिक मंत्री श्री विनोद तावडे व सौ अमृता फडणवीस यांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल गोरक्ष धोत्रे यांनी आभार मानले.
या कार्यकारिणीत अभिनेते नागेश भोसले व किशोरी अंबिये यांची महाराष्ट्र उपाध्यक्ष, अभिनेते यशोधन बाळ,महाराष्ट्र चिटणीस , अभिनेते मिलिंद दास्ताणे(तुज्यात जीव रंगला) पुणे सरचिटणीस,व प्रमूख सल्लागार पदी सुहासिनी देशपांडे व ज्योती चांदेकर यांच्या सह दिग्दर्शन,छाया, आर्ट,निर्मिती,नाट्य क्षेत्रातील दिग्गज यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या उपाध्यक्षा डॉ.प्रीती व्हिक्टर व सुहास निबंधे यांनी केले.
Comments
Post a Comment