Posts

Showing posts from September, 2017

मंत्रालयातील बैठक

Image
प्रसिद्धी पत्रक चित्रपट, टेलिव्हिजन व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या दृष्टीने निश्चित स्वरूपाचे धोरण आखेले जाईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुबई: ४ सप्टेंबर २०१७, मंत्रालय "चित्रपट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मिडिया या क्षेत्राची सांगड घालण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षात बरीच स्थित्यंतरे या क्षेत्रात आल्यामुळे कामाचे स्वरूप आणि वर्तमान आव्हान या मुळे संघर्ष उभा राहत आहे. 'ब्रॉडकास्टर' नावाचा घटक या क्षेत्रात नव्याने महत्वाची भूमिका पार पाडत आहे. त्याला दुर्लक्षून चालणार नाही. तो मुख्य स्तोत्र झाला असून संघर्ष मात्र कामगार आणि निर्माता वर्गा मध्ये होत आहे" असे निरीक्षण राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलेंगेकर पाटील यांनी मंत्रालयात पार पाडलेल्या एका बैठकीत व्यक्त केले. दिनांक ३० ऑगस्ट रोजी कामगार मंत्र्यांनी विनंती केल्यावर संपावर गेलेल्या चार लाख चित्रपट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. आणि आज झालेल्या चित्रपट, टेलिव्हिजनचे निर्माते आणि कामगार वर्गाच्या प्रतिनिधी मध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. *या बैठकीला भाजपाचे मुबई अध्यक्ष, आमदार - आशिष शेलार,...