भाजपा सरकार कामगिरी दमदार

# भाजपा सरकार कामगिरी दमदार माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे महाराष्ट्र सरकारच्या राज्यकारभाराची तीन वर्षे पूर्ण केली. केंद्र व राज्य सरकारने निर्माण केलेला विश्वास व विकासाच्या कामाला जनतेने पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत, वॉर्डावॉर्डांत जाऊन सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोचवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी करत आलेआहेत. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारच्या विविध सरकारी योजनांची पुस्तिका भाजपा चित्रपट कामगार आघाडीने प्रसिद्ध केली आहे. टेलिव्हिजन व चित्रपट माध्यमातील कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांच्यापर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारने तीन वर्षात केलेल्या सरकारी योजनांची माहिती पोहचवण्यासाठी या पुस्तिकेचे निर्माण केले आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशअध्यक्ष मा.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी या सरकारी योजनांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष श्री संजय केनेकर व भाजपा चित्रपट आघाडीचे प्रदेश अध्यक्ष श्री.गौरक्ष धोत्रे उपस्थि...