वाढदिवसानिमित्त वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. रावसाहेब दानवे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर भरवण्यात आले. हे शिबीर दिनांक २२ मार्च २०१८ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत सुनील शॉपिंग सेंटर , जे पी रोड , नवरंग सिनेमा समोर , अंधेरी (प) , येथे आयोजित करण्यात आले. ह्या शिबिराचे आयोजन भाजपा चित्रपट कामगार आघाडी चे मुंबई उपाध्यक्ष मा. श्री. नवीनजी करमियानी यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. संतोष बनसोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ह्या शिबिरामध्ये २५० पेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला. भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. गोरक्षजी धोत्रे साहेब ह्या शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे पदाधिकारी संतोष गायकवाड , महादेव साळोखे , दीपक खांडेकर , अनिल भदरगे , शशिकांत दासन , डॉ. शशिकांत बामणे , राजश्री वर्मा , तुषार नामये , मयूर केणी व इतर हजर होते. व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे रघुवीर तुरेकर वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक...