Posts

Showing posts from June, 2017

विद्यार्थ्यांचा सत्कार

Image
भाजपा चिञपट कामगार आघाडी च्या  (  पुणे व   पिंपरी_चिंचवड_शहर  ) वतीने १० वी व १२ वी मध्ये ८०% पेक्षाहुन जास्त मार्क्स मिळवुन उत्तीर्ण झालेल्या १३० गुणवंत विद्यार्थ्यांचा काल दि.१९/६/२०१७ रोजी प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला...

महाराष्ट्र टाइम्स पुणे आवृत्तीतील बातमी

Image
चित्रपट क्षेत्रात प्रस्थापित राजकीय पक्षांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी "भाजपा" सक्रिय ! प्रेक्षक, कलाकार, कामगारभिमुख चळवळ राबवणार ! चित्रपट व्यवसायातील सर्वसामावेक घटकाच्या हितासाठी काम करणार. - महाराष्ट्र टाइम्स पुणे आवृत्तीतील बातमी (१४जून) वंदे मातरम !!

चित्रपट क्षेत्रात भाजपचा ‘प्रवेश’

Maharashtra Times | Updated: Jun 14, 2017, 03:00AM IST 0 0 म. टा. प्रतिनिधी, पुणे केंद्र, विविध राज्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाने यश मिळविल्यानंतर भाजपने आता चित्रपट क्षेत्रातही ‘प्रवेश’ केला आहे. राजकीय पक्षाची चित्रपट शाखा म्हटले, की शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष डोळ्यापुढे येतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्ष संघटना या क्षेत्रात फारशा क्रियाशील नसल्याने भाजपने ‘भाजप चित्रपट कामगार आघाडी’ काढून थेट शिवसेनेलाच आव्हान दिल्याचे म्हटले जात आहे. भाजपप्रमाणे या संघटनेतही जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. भाजपने देशात यश मिळविल्यानंतर विविध क्षेत्रांत पक्षाच्या शाखा सुरू झाल्या आहेत. त्याप्रमाणे चित्रपट क्षेत्रातही भाजपने प्रवेश केला आहे. काही महिन्यांपूर्वी ‘भाजप चित्रपट कामगार आघाडी’ स्थापन करण्यात आली असून ती भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीशी संलग्न करण्यात आली आहे. चित्रपट कामगार आघाडीची मुंबईत स्थापना झाल्यानंतर नुकतीच पुण्याचीही शाखा सुरू झाली आहे. यामध्ये पुण्यातील ...

पश्चिम महाराष्ट्राची कार्यकारणी बैठक

Image
दिनांक ९ जून २०१७, पुणे ​ भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राची कार्यकारणी बैठक डॉ. प्रीती विक्टर यांनी पुणे येथे घेतली. या कार्यक्रमाला भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष संजय भाऊ केनेकर व चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष गोरक्षजी धोत्रे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. सर्व नूतन पदाधिकारी यांचे स्वागत करून संजय केनेकर यांनी संघटनेची पुढील वाटचाल व नियोजन कसे असावे याविषयी भाष्य केले. संघटनेचा प्रोटोकॉल, चित्रपट क्षेत्रात कामगारभिमुख चळवळ र्गदर्शन केले. त्यानंतर गोरक्ष धोत्रे यांनी पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, सभासद नोंदणी याबाबत माहिती दिली. व भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या सभासदांना संघटनेद्वारे जास्तीत जास्त रोजगार कसा मिळवून देता येईल, केलेल्या कामाचे सोशल मीडिया द्वारे प्रसिद्धी करून लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत याविषयी मार्गदर्शन केले. कशी राबवावी याविषयी सविस्तर मा विभागानुसार पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कामाचे संयोजन आणि चित्रपट कामगार आघाडीचे कार्य आपापल्या विभागात कसे पार पाडता येईल या विषयीची चर्चा डॉ. प्रीती विक्टर यांनी या बैठकीत पार पा...