गोरेगाव फिल्मसिटीच्या आवारात तणावपूर्ण वातावरण
मुबई दिनांक : १६ ऑगस्ट २०१७
"गोरेगाव फिल्मसिटीच्या आवारात तणावपूर्ण वातावरण ! अनेक ठिकाणी चित्रपटाची शूटिंग बंद ठेवण्यात आली आहे "
चित्रपटकर्मीनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंध आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण थांबले आहे. फिल्मसिटीच्या आवारात चित्रपटकर्मीनी ठिय्या आंदोलन पुकारले आहे. चित्रपट निर्मात्यांनी मागण्या मान्य नाही केल्या तर हा संप चिघळण्याची शक्यता आहे. भाजपा चित्रपट कामगार आघाडीने कामगारांच्या रास्त मागणीसाठी या संपाला पाठिंबा दिला आहे. निर्मात्यांनी सकारात्मक भूमिका घेतली तरच यावर तोडगा निघू शकतो. अद्याप असे काही संकेत मिळाले नसून चित्रपटकर्मीचा वाढता रोष पाहता येत्या २४ तासात आंदोलन भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.
Comments
Post a Comment