एक धागा अंधारातून चमकणाऱ्या नात्याचा

एक धागा अंधारातून चमकणाऱ्या नात्याचा.
एक अनोखं रक्षाबंधन रविवार दिनांक ६ ऑगस्ट २०१७ रोजी भाजपा चित्रपट कामगार आघाडीतर्फे मुलींच्या अंधशाळेत रक्षाबंधन साजरे केले.असा एक धागा बांधण्यात आला त्यातून त्यांना उज्ज्वल भविष्याचा विश्वास निर्माण करण्यात आला. मुलींनी बहीण भावांच्या नात्यावर गाणी म्हणून आम्हा सगळ्यांना मंत्रमुग्ध केले तसेच अभिनेते संतोष चोरडिया यांनी मुलींना खूप हसाविले तर प्रीती व्हिक्टर मॅडम यांनी मुलींना जगण्याचा कानमंत्र दिला. प्रस्तावना वृंदा बाळ यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन सुनंदा मॅडम ,मंदार जोग ,वृंदा बाळ यांनी केले या कार्यक्रमास भाजपा चित्रपट कामगार आघाडी चे अध्यक्ष श्री गौरक्ष धोत्रे यांचे मार्गदर्शन लाभले प्रमुख उपस्थिती भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे महा.सरचिटणीस प्रीती विक्टर महा. उपाध्यक्ष सुहास निबंध, पुणे उपाध्यक्ष- संतोष चोरडिया, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, सचिव अभिनेत्री मुक्ता पटवर्धन, पि.-चिं. शहर उपाध्यक्ष अभिनेते दिग्दर्शक केतन लुंकड, चिटणीस- शैलेश पुसतकर ,सचिव- कैलास वाघ,उपसचिव-मनोज थोरात व शाळेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते .


Comments

Popular posts from this blog