Posts

Showing posts from February, 2018

मराठी राजभाषा दिन

Image
आज दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त मराठी राजभाषा दिन साजरा केला गेला तसेच जेष्ठ कलाकार व नागरिक यांचा सत्कार व  गीता ची मराठी  प्रत मराठी राजभाषा दिवस म्हणून भेट दिली याप्रसंगी भाजपा चित्रपट कामगार आघाडी चे पदाधिकारी व कल्याण डोंबिवली चे सरचिटणीस श्री  शिवाजी आव्हाड देखील उपस्थित होते. सांस्कृतिक संचलन विभागाचे श्री भालेराव , चित्रपट आघाडी अध्यक्ष गोरक्ष धोत्रे , पुणे  विभागाचे सरचिटणीस व अभिनेते मिलिंद दास्ताने (तुझ्यात जीव रंगला चे आबा), उपाध्यक्ष संतोष बनसोडे, संदीप मिश्रा, चिटणीस संतोष गायकवाड, ग्लोरिया सॅमसन, राजेंद्र दळवी, जितेन पुजारी, अनिल भदरगे, नंदकिशोर मसुरकर, ओमकार वैद्य, योगेश कांबळे, प्रकाश चौरसिया, दीपक खांडेकर, नीता गवळी, महादेव साळोखे, वर्षा घाटपांडे, मीनाक्षी कुलकर्णी, राजश्री वर्मा, नवीन करमियानी , योगेश कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीदेवी यांना श्रद्धांजली

Image
आज दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात  वीर शहीद चंद्रशेखर आझाद  यांच्या  पुण्यतिथी  निमित्ताने आदरांजली वाहिली तसेच  पद्मश्री श्रीदेवी  यांना  श्रद्धांजली  देखील वाहिली. याप्रसंगी भाजपा चित्रपट कामगार आघाडी चे पदाधिकारी व  कल्याण डोंबिवली चे सरचिटणीस   श्री  शिवाजी आव्हाड  देखील उपस्थित होते.  सांस्कृतिक संचलन विभागाचे श्री भालेराव , चित्रपट आघाडी  अध्यक्ष गोरक्ष धोत्रे , पुणे  विभागाचे  सरचिटणीस  व  अभिनेते मिलिंद दास्ताने  (तुझ्यात जीव रंगला चे आबा), उपाध्यक्ष संतोष बनसोडे, संदीप मिश्रा, चिटणीस संतोष गायकवाड, ग्लोरिया सॅमसन, राजेंद्र दळवी, जितेन पुजारी, अनिल भदरगे, नंदकिशोर मसुरकर, ओमकार वैद्य, योगेश कांबळे, प्रकाश चौरसिया, दीपक खांडेकर, नीता गवळी, महादेव साळोखे, वर्षा घाटपांडे, मीनाक्षी कुलकर्णी, राजश्री वर्मा, नवीन करमियानी , योगेश कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जागतिक मराठी राजभाषा दिन

Image
मराठी भाषा दिवस  हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला पाळला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि समस्त मराठीजनाची मागणी आहे ”इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी” अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करत ब्रह्मविद्या म्हटले आहे, शब्दब्रह्मही म्हंटले आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते. अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो।जय मराठी|| हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढ दिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन पाळला जातो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय  मानतो मराठी मराठी असे आमुची मायबोली... म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात ...

Free Medical Camp

Image
Held medical health checkup camp on 10th February & 11th February 2018 at Shastri Nagar Recreation club, Andheri W with association with ICICI Prudential. Organised by Mr. Navin Karmiani, Vice President - BJP Chitrapat Kamgar Aghadi

छत्रपती शिवाजी महाराज कि जय...

Image
आज दिनांक १९ फेब्रुवारी २०१८ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती ,  तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परम पूज्य श्री गुरुजी माधव सदाशिव गोवळकर यांची देखील जयंती  अतिशय उत्साहात व आनंदात भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. गोरक्ष धोत्रे , मुंबई उपाध्यक्ष श्री नवीन करमियानी , संतोष बनसोडे, संतोष गायकवाड, राजश्री वर्मा, राजेंद्र दळवी, संदीप मिश्रा, अनिल भदरगे, जितेन पुजारी, धनंजय, भूषण आग्रे व इतर सहकारी उपस्थित होते   Today, on 19th February, 2018, 388th birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaja  as well as  2 nd  Sarsanghchalak Sri Guruji Madhav Sadashiv Govalkar was celebrated at the Central Public Relations Office of the BJP Chitrapat Kamgar Aghadi, with great zeal and joy. At that time Maharashtra State President Mr. Mr. Gor aksha  Dhotre, Vice President of Mumbai, Mr. Navin Karmiani , Santosh Bansode, Santosh Gaikwad, Raj...

“स्व. वामनराव महाडीक मार्ग” या मार्ग निर्देशक चौथऱ्याचे नूतनीकरण

Image
आपल्या विभागातील सरदार वल्लभभाई पटेल नगर , म्हाडा वसाहत येथील रस्त्याला , सर्वश्रुत असलेले शिवसेनेचे पाहिले आमदार , माजी महापौर तसेच दक्षिण मुंबईतून नवव्या लोकसभे तील शिवसेनचे पहिले खासदार , शिवसेना नेते “ स्व. वामनराव महाडिक ” यांचे नाव दिलेले आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते मा. नारायण राणे यांच्या हस्ते दि. २६ फेब्रु २००३ रोजी सदर मार्ग निर्देशक चौथऱ्याचे उदघाटन जाहले होते. सध्या हा चौथरा सुस्थितीत नाही , ही खंत आहे. स्व. वामनराव महाडिक यांची कारकीर्द अतिशय उल्लेखनीय आहे. त्यांच्या कारकिर्दीची आठवण राहावी याकरिता त्यांच्या पश्चात ‎ तेथील रस्त्याला त्यांचे नाव दिले गेले . या शहरात किंवा आपल्या विभागात नव्याने राहायला आलेल्या तसेच शहराबाहेरून आलेल्या नागरिकांना रस्त्या च्या नावाबरोबर संबंधित महनीय व्यक्तीच्या कार्याची माहिती कळणे देखील जरुरीचे आहे. त्यामुळे सुस्थितीत नसले ल्या सदर मार्गनिर्देश क चौथर्याचे नूतनीकरण करून स्व. वामनराव महाडिक यांच्या कार्याची महती सांगणारा मजकूर देखील तिथे असायला हवा , असा आमचा विनंती पूर्वक प्रस्ताव आहे.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी

Image
भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. गोरक्ष धोत्रे यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहिली.

चित्रपट महर्षी मा. दादासाहेब फाळके यांची पुण्यतिथी

Image
भाजपा चित्रपट कामगार आघाडी तर्फे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपटमहर्षी मा. दादासाहेब फाळके यांची ७४ वी पुण्यतिथी आज दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी जनसंपर्क कार्यालयात श्री. गोरक्ष धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. त्यांना अभिवादन करताना राजेंद्र दळवी, ओमकार वैद्य, संतोष बनसोडे, संतोष गायकवाड. वोनीद निकम, वर्षा घाटपांडे, नीता गवळी, नवीन करमियानी, योगेश कांबळे, शशी शिवदासन, अनिल भदरगे व भूषण आग्रे उपस्थित होते.

"प्रभो शिवाजी राजा" साठी चित्रपट गृहाची कमतरता

Image
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित पहिला मराठी सचेतन-तरलपट (animation) १६ फेब्रुवारी २०१८ ला प्रदर्शित होणार आहे त्यासाठी चित्रपट गृहात जास्त शो मिळत नसल्यामुळे निर्मात्यांनी भाजपा चित्रपट कामगार आघाडी कडे रीतसर मदत मागितली. एका मोठ्या अभिनेत्याचा दुसरा मराठी चित्रपट अगोदरच प्रदर्शित झाल्यामुळे आम्हाला जास्त शो मिळत नाहीत असा जबाब मिळाल्यामुळे स्वराज्याच्या व रयतेच्या राजाच्या आयुष्यावरील पहिला मराठी तरलपट याला चित्रपट गृह मिळावे यासाठी भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष म. श्री. गोरक्ष धोत्रेजी यांनी त्वरीत सर्व चित्रपट गृहाच्या मालकांना पत्र लिहून जास्तीत जास्त थिएटर व शो मिळवून देण्याची विनंती केली आहे.
Image
पंडित दिन द्याल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)   व   खा.श्री रावसाहेब दानवे पाटील (प्रदेश अध्यक्ष. भाजप)  तसेच   श्री संजयजी केणेकर (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष - भाजपा कामगार आघाडी)   यांच्या मार्गदर्शनाने  गोरक्ष धोत्रे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रपट कामगार आघाडी ) यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व सहकारी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या उपक्रमात आपण गरजू गरीब विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षा लक्षात घेऊन माध्यमिक (दहावीच्या) विद्यार्थ्यांना नवनीत अपेक्षित संच अभ्यासिकेच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री साहिला चड्डा तसेच संतोष बनसोडे, संतोष गायकवाड, शशिकांत शिवदासन, अनिल भदरगे, हेमांगी महाडिक, प्रकाश चौरासिया, विनोद निकम, अरुण सोनार, मयूर केणी, ओमकार वैद्य व राजू वैष्णव उपस्थित होते.  आयोजक: श्री नविन करमियानी उपाध्यक्ष – मुंबई प्रदेश भाजपा चित्रपट कामगार आघाडी