जागतिक मराठी राजभाषा दिन

मराठी भाषा दिवस  हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला पाळला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि समस्त मराठीजनाची मागणी आहे ”इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी” अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करत ब्रह्मविद्या म्हटले आहे, शब्दब्रह्मही म्हंटले आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते. अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो।जय मराठी||
हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढ दिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन पाळला जातो.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय  मानतो मराठी
मराठी असे आमुची मायबोली... म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात ,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी. मराठी भाषादिनाच्या हार्दीक शुभेच्छा.
मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता भाजपा चित्रपट कामगार आघाडी तर्फे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात वरिष्ठ नागरिकांचा व ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार आयोजित केला आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यलयात उपस्थित रहावे.
गोरक्ष धोत्रे
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
भाजपा चित्रपट कामगार आघाडी


Marathi Language Day is celebrated on 27th February by Marathi speakers all over the world. On the occasion of the birth anniversary of the Marathi poet Vishnu Vaman Shirwadkar alias Kusumagraj, this practice started as 'Marathi language day'. On the occasion of the birthday of Marathi poet Vishnu Vaman Shirwadkar alias Kusumagraj, this day 'Marathi Language Day' celebration has been organized by the BJP Chitrapat Kamgar Aghadi on 27th February, 2018, by felicitation of senior citizens and senior artists at the Central Public Office. However, all the office bearers should be present in the office tomorrow by 05.00 pm.
Thanks & Regards
Gouraksha Dhotre

Comments

Popular posts from this blog