“स्व. वामनराव महाडीक मार्ग” या मार्ग निर्देशक चौथऱ्याचे नूतनीकरण
आपल्या विभागातील सरदार वल्लभभाई पटेल नगर, म्हाडा वसाहत येथील
रस्त्याला, सर्वश्रुत असलेले
शिवसेनेचे पाहिले आमदार, माजी महापौर तसेच दक्षिण मुंबईतून नवव्या लोकसभेतील शिवसेनचे पहिले खासदार, शिवसेना नेते “स्व. वामनराव महाडिक” यांचे नाव दिलेले आहे.
तत्कालीन विरोधी पक्षनेते मा. नारायण राणे यांच्या हस्ते दि. २६ फेब्रु २००३ रोजी सदर मार्ग निर्देशक
चौथऱ्याचे उदघाटन जाहले होते. सध्या हा चौथरा सुस्थितीत नाही, ही खंत आहे. स्व. वामनराव महाडिक यांची कारकीर्द अतिशय उल्लेखनीय
आहे. त्यांच्या कारकिर्दीची आठवण राहावी याकरिता त्यांच्या पश्चात तेथील रस्त्याला त्यांचे नाव दिले गेले. या शहरात किंवा आपल्या विभागात नव्याने राहायला आलेल्या तसेच शहराबाहेरून
आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या नावाबरोबर संबंधित महनीय व्यक्तीच्या कार्याची माहिती कळणे देखील जरुरीचे
आहे. त्यामुळे सुस्थितीत नसलेल्या सदर मार्गनिर्देशक चौथर्याचे
नूतनीकरण
करून स्व. वामनराव महाडिक यांच्या कार्याची महती सांगणारा मजकूर देखील तिथे असायला
हवा, असा
आमचा विनंती पूर्वक प्रस्ताव आहे.
Comments
Post a Comment