सिनेविस्टा कडून मयत कामगाराला नुकसान भरपाई
दिनांक ०६ जानेवारी २०१८ रोजी
मुंबई येथील कांजुरमार्ग स्थित आपल्या चित्रीकरण स्टुडीओ ला भीषण आग लागली होती.
या दुर्दैवी घटनेत आपला एक कामगार कै. गोपी वर्मा याचा हकनाक बळी गेला होता.
त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या कुटुंबियांना निराधार होण्याची वेळ आली होती.
त्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता आपणासोबत सातत्याने बोलणी करत होतो त्यास आपण
अनुकूल प्रतिसाद दिला आणि अंतिम बैठकीमध्ये आपण कै. गोपी वर्माच्या कुटुंबियांना
रु. ३५,००,०००/- (अक्षरी: पस्तीस लाख फक्त) तसेच त्याच्या कुटुंबीयापैकी एकाला
आपल्या आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे मान्य केले आहे. त्याबद्दल भरतीत
जनता पार्टी व भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते
कृतज्ञता व्यक्त करत आहे.
Comments
Post a Comment